February 25, 2025 8:37 AM February 25, 2025 8:37 AM

views 24

नवीन शैक्षणिक वर्षापासून ‘स्कूल बस’साठी नियमावली लागू

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बससाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. परिवहन विभागाच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ही नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे. पुढच्या एक महिन्यात या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.