November 26, 2025 7:13 PM

views 61

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी ऐवजी  २२ फेब्रुुवारी २०२६ ला घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षी अर्थात सीटीईटी ८ फेब्रुवारी २०२६ ला घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

June 20, 2025 6:26 PM

views 11

हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही – शरद पवार

हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण, हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही, असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. राज्यात सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या वादावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, कोणाला स्वसंमतीनं हिंदी भाषा शिकायची असेल तर त्याला  नाही म्हणण्याचं कारण नाही. हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतील, असं...

June 18, 2025 7:48 PM

views 54

शाळांमध्ये हिंदी अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारने शुद्धीपत्रक जारी केलं. आता विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून, किमान २० विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल, असं या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट केलं आह...

February 2, 2025 7:43 PM

views 13

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल - असर - प्रकाशित करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. ६ ते १४ वर्ष वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण राज्यात ४ दशांश टक्के आहे. देशभरात हे ...

January 2, 2025 9:57 AM

views 21

नाशिक जिल्ह्यात भरते 365 दिवसांची शाळा

भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने शिक्षक सतत कार्यरत असतात. असेच एक शिक्षक आहेत केशव चंदर गावीत. गावीत यांच्या मेहनतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम भागात असलेली एक शाळा वर्षाचे 365 दिवस सुरू असते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.या शाळेत मुलं एकही दिवस सुटी न घेता ते ही सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आवडीने शिक्षण घेतात. इतकेच नव्हे तर बालवाडी आणि पहिलीच्या मुलांचे 1 ते 70 पर्यंत पाढे पाठ आहेत. तर मोठ्या वर्गातील मुलांचे 1100 पर्यंतचे पाढे पाठ आहेत. या म...

August 23, 2024 7:37 PM

views 14

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्रक्रिया अहवाल, संबधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन याबरोबरच सुरक्षित वातावरण याचे मापदंड यावर भर दिला आहे.

August 22, 2024 3:32 PM

views 14

राज्यात येत्या महिन्याभरात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक

महाराष्ट्रात बदलापूर, आणि घाटकोपर मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील. कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले...

August 3, 2024 7:31 PM

views 19

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संविधानातून सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळते. विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या या मंदिरांमध्ये भ...