November 25, 2025 3:21 PM November 25, 2025 3:21 PM
40
नवीन कामगार कायद्यांमुळे बेरोजगारीत १.३ दशांश टक्केपर्यंत घट होईल- SBI
नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत जाईल. आजघडीला हे प्रमाण ६० पूर्णांक ४ दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारां...