October 11, 2024 7:35 PM

views 22

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि इतर यावेळी उपस्थित होते.