October 19, 2024 11:03 AM October 19, 2024 11:03 AM
3
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तारखा जाहीर
जगभरातल्या शास्त्रीय संगीत रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा 70व्या वर्षात पदार्पण करणारा 5 दिवसांचा हा संगीत महोत्सव पुण्यात मुकुंद नगर मधल्या महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात येत्या 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.