May 28, 2025 12:34 PM May 28, 2025 12:34 PM

views 4

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त आदरांजली

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या  जयंतीनिमित्त  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं सावरकरांचं योगदान तसंच त्यांचं अतुलनीय  धैर्य आणि संघर्ष,  एक कृतज्ञ राष्ट्र म्हणून  आपण कधीही विसरू शकत नाही, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजामध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.