December 30, 2025 8:34 PM

views 18

येमेनमधल्या मुकाल्ला शहरावर सौदी अरेबियाकडून बॉम्बहल्ला

सौदी अरेबियाने आज पहाटे येमेनमधल्या मुकाल्ला या शहरावर बॉम्बहल्ला केला. संयुक्त अरब अमिरातीच्या पूर्व किनाऱ्यावरच्या फुजैरा या बंदरातून मुकाल्ला बंदरात आलेल्या जहाजांवरून शस्त्रास्त्र उतरवली गेली. याचा सुरक्षेला आणि स्थैर्याला धोका असल्यामुळे हा हल्ला केल्याचं सौदी अरेबियाच्या लष्करानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.    दरम्यान, सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यांनंतर येमेनच्या हौथी-विरोधी लष्करानं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे.

November 17, 2025 8:27 PM

views 32

सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान ४० भारतीयांचा बस अपघातात मृत्यू

सौदी अरेबियात बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला असून केवळ १ जण बचावला आहे. मृतांमध्ये १७ पुरुष, १८ महिला आणि १० बालकं आहे. यात मरण पावलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियाला ५ लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा  सरकारनं जाहीर केलं आहे. तेलंगणा सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ सौदी अरेबियाला पाठवण्याचा निर्णयही  राज्य सरकारनं घेतला आहे.

September 11, 2025 2:23 PM

views 19

सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ

रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ झाला. जेद्दाह इथला भारतीय वाणिज्य दूतावास, रियाधमधला भारतीय दूतावास तसंच भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यातून या दोन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.   या प्रदर्शनात २५० स्टॉलमधून २०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील तर २ हजारांहून अधिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनात सोनं आणि विविध रत्नाची आभूषणं, तस...

March 11, 2025 6:04 PM

views 12

सौदी अरेबियात रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चा

युक्रेन आणि रशियात सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी सौदी अरेबियात जेद्दाह इथं युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय चर्चेला आज सुरूवात झाली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, युक्रेनचे अधिकारी आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत.    काळ्या समुद्राच्या प्रदेशात युद्धविराम व्हावा असा आपला प्रस्ताव असेल, यामुळे जहाजांची ये जा सुरळीत होऊ शकेल अशी माहिती या युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी दिली होती. त्याचवेळी युक्रेनमधील दुर्मीळ खनिज संप...

July 24, 2024 1:45 PM

views 17

ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक सौदी अरेबियामध्ये होणार

पुढच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ई-स्पोर्ट्स अर्थात ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४२ व्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. यामुळं डिजिटल क्रांतीसोबत ऑलिम्पिक जोडलेलं राहिल, अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली आहे.  ई-स्पोर्ट्स आयोग आणि सौदी अरेबियाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या खेळांचं आयोजन करणार आहे. स्पर्धेचं शहर, ठिकाण, खेळ आणि खेळाडूंच्या पात्रतेचे निकष लवकरच ठरवले जाणार आहेत.  गेल्या २ वर्षात सौदी अरेबियानं ऑनलाइन गेम्सच्या अनेक...