December 21, 2025 9:16 AM

views 43

BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला कांस्यपदक

बॅडमिंटनमध्ये, काल चीनमधील हांगझोऊ इथं झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 या स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं कास्यपदक मिळवलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुसऱ्यांदा पदकाची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2018 मध्ये, पीव्ही सिंधूनं महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलं होतं.