October 25, 2025 8:10 PM October 25, 2025 8:10 PM

views 150

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.  त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.    १९७२ मधे पुण्याच्या  चित्रपट प्रशिक्षण संस्थेमधून अभिनय क्षेत्रात आलेले सतीश शहा यांच्या अनेक भूमिका गाजल्या.  दूरदर्शनवर आलेल्या त्यांच्या ये जो है जिंदगी या मालिकेत विविध रंगी भूमिकांनी ते रसिकांच्या मनात घर करुन राहिले. जाने ...