January 3, 2025 7:31 PM January 3, 2025 7:31 PM

views 13

शेतीच्या नुकसानाचे उपग्रहाव्दारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात आयोजीत किसान संवाद मेळाव्यात बोलत होते.   शेतकरी अन्य राज्यात शेतमाल विकणार असेल, तर त्यासाठी वाहतूकीचा खर्च येईल तो खर्च केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी पन्ना...