November 26, 2025 11:51 AM November 26, 2025 11:51 AM

views 10

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन

केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे. सरदार पटेलांचं मूळ गांव असलेल्या करमसाड गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून ६ डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सांगता होणार आहे. स्वच्छता, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश या दीडशे किलोमीटरच्या पदयात्रेतून दिला जाणार असल्याचं केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

November 1, 2025 9:20 AM November 1, 2025 9:20 AM

views 38

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राज्यासह देशात एकता दिवस म्हणून साजरी

सरदार वल्लभभाई पटेल यांना देशभरातून काल आदरांजली वाहाण्यात आली. अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्व असणारे दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माते, ज्यांनी राष्ट्राला एकत्र आणण्याचे कार्य केले अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली.   तर संस्थानांचं विलीनीकरण आणि देशाच्या एकतेसाठी पटेल यांचं अमूल्य योगदान प्रेरणादायी असल्याचं उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहाताना म्हणाले. देशाचं अखंडत्व, सुशासन यांप्रती पटेल यांची वचनबद्धता भावी पिढ्यांना प्रेरणा...

October 31, 2025 8:33 PM October 31, 2025 8:33 PM

views 33

विकसित भारत साकारण्यासाठी संघटित होऊन स्वतःला समर्पित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी संघटित होऊन स्वतःला समर्पित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते. २०१४ पासून सरकारनं नक्षलवाद आणि माओवादावर निर्णायक आणि शक्तिशाली प्रहार केला आहे. २०१४ पूर्वी देशभरातले जवळपास शंभर जिल्हे माओवादी कारवायांनी प्रभावित होते, पण आज ही संख्या अकरापर्यंत खाली आली आहे. तर, फक्त तीन जि...

October 31, 2025 6:50 PM October 31, 2025 6:50 PM

views 18

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं. तसंच दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवी मुंबईत बेलापूर, रबाळे आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालय इथं एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित केले होते.    बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथल्या एकता द...

October 31, 2025 3:14 PM October 31, 2025 3:14 PM

views 52

देशाला एकसंध राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान-अमित शहा

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध राखण्यात आणि आजच्या भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीत आयोजित रन फॉर यूनिटीला त्यांनी आज प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार क...

October 31, 2025 1:34 PM October 31, 2025 1:34 PM

views 18

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर झाली आहेत. विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायवैद्यक शास्त्र या चार क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.

October 30, 2025 3:38 PM October 30, 2025 3:38 PM

views 467

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. भारताचे  पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रीया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल भारताच्या एकतेचे शिल्पकार  म्हणून ओळखले जातात. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा शतकोत्तर सुवर्णजयंतीचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत.   गुजरातमधे केवडिय...

December 15, 2024 2:06 PM December 15, 2024 2:06 PM

views 9

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली.सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य, राष्ट्राची एकता, अखंडता तसंच, विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरिता देशवासीयांसाठी प्रेरणास्थान राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.   गृहमंत्री अमित शहा यांनीही सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५५०हून अधिक संस्थानांच...

October 31, 2024 2:57 PM October 31, 2024 2:57 PM

views 6

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिनाचे कार्यक्रम

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जगदीप धनखड यांनी आज सकाळी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकता नगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं.  नवी दिल्लीच्या जुन्या संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला संसद सदस्यांनी तसंच दोन्ही सभागृहांच्या महासचिवांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. १९५८ मधे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. र...

October 29, 2024 7:55 PM October 29, 2024 7:55 PM

views 10

भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांची १५० वी जयंती श्रीलंकेत साजरी

भारताचे लोहपुरुष आणि आणि भारताच्या एकतेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांची १५० वी जयंती श्रीलंकेत कोलंबो इथंही साजरी केली गेली. यानिमित्तानं कोलंबोतल्या लिओनेल वेंडट आर्ट सेंटर इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि वारसा सांगणारं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं. या प्रदर्शनात सरदार पटेल यांचा जीवनप्रवास मांडला आहे. हे प्रदर्शन उद्या संध्या ७ वाजेपर्यंत खुलं असणार आहे...