September 30, 2024 9:06 PM September 30, 2024 9:06 PM
4
क्रूझ भारत अभियानाद्वारे पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं लक्ष्य
क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत जहाजावरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती केंद्रीय बंदरं, वाहतूक आणि पर्यटन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. मुंबई इथं एम्प्रेस जहाजावर आज क्रूझ भारत अभियानाचा प्रारंभ सोनोवाल यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा भारतातल्या समुद्री पर्यटन क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेतला मैलाचा दगड आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. भारताच्या जलपर्यटन क्षेत्राकडे मोठ्या काळापासून दुर्लक्ष झालं असून या अभियानाम...