December 7, 2024 5:30 PM December 7, 2024 5:30 PM

views 3

हिंदी भाषा सर्वांना एकत्र आणण्याचं तसंच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेकरता महत्वाची भूमिका बजावते-सर्बानंद सोनोवाल

हिंदी भाषा सर्वांना एकत्र आणण्याचं काम करते तसंच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेकरता महत्वाची भूमिका बजावण्याचं काम करते असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं. ते आज चेन्नई इथं दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या  ८३ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. दक्षिण भारत हिंदी प्रचारसभा महात्मा गांधी यांच्या विचारानुसार काम करते, असं सोनोवाल म्हणाले. यावेळी प्रवीण आणि विशारद परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या ८ हजार विद्यार्थ्यांना सोनोवाल यांनी पदवी प्रदान केली. द...

September 14, 2024 1:49 PM September 14, 2024 1:49 PM

views 8

सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन

केंद्रीय बंदर, जहाज  और जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज कोचीन शिपयार्ड मध्ये देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन दूरस्थ पद्धतीनं झालं.   यामुळे  भारताच्या सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.  ड्रेजर मशीनच्या सहाय्यानं नदी, नाले , बंदरं यांची खोली वाढवता येते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सोनोवाल म्हणाले.

August 29, 2024 7:06 PM August 29, 2024 7:06 PM

views 8

वाढवण बंदर देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल – मंत्री सर्बानंद सोनोवाल

वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पालघर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.   आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करताना हे बंदर एक महत्व...