June 24, 2025 6:41 PM June 24, 2025 6:41 PM

views 12

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलैला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड इथल्या न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग नाही असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने न्यायालयात केला. त्याला विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले, याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.

May 19, 2025 7:01 PM May 19, 2025 7:01 PM

views 16

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जूनला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी विष्णु चाटे यानं दाखल केलेला डीस्चार्ज अर्ज आज मागे घेतला. तसंच तक्रारदार शिवराज देशमुख, सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी ३ जून रोजी होणार आहे.  

March 4, 2025 7:33 PM March 4, 2025 7:33 PM

views 13

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केलं नाही हा प्रश्न आहे, असं सपकाळ म्हणाले. सरकार मुंडेंना वाचवायचा प्रयत्न करत होतं असा आरोप सपकाळ यांनी केला.

March 4, 2025 2:57 PM March 4, 2025 2:57 PM

views 32

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभागानं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जनतेनं  कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी पो...

February 26, 2025 8:38 PM February 26, 2025 8:38 PM

views 15

बीड सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यासंदर्भातलं परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली. 

January 22, 2025 7:44 PM January 22, 2025 7:44 PM

views 86

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्याती मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड याच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

January 15, 2025 6:47 PM January 15, 2025 6:47 PM

views 9

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत कराडला बाहेर काढावं लागलं. 

January 10, 2025 7:07 PM January 10, 2025 7:07 PM

views 13

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोग स्वतंत्रपणे चौकशी करणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे.   संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती. आयोग राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असून ⁠सुरू असलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचं सोनावणे यांनी सांगितलं.

January 10, 2025 3:40 PM January 10, 2025 3:40 PM

views 9

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगाकडून गुन्हा दाखल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे. संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती. आयोग राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असून ⁠सुरू असलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचं सोनावणे यांनी सांगितलं.

January 9, 2025 7:06 PM January 9, 2025 7:06 PM

views 9

वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

बीड जिल्ह्यातल्या सरपंच हत्याप्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. ती झाली असती तर सरपंच हत्याप्रकरण घडलंच नसतं, अस त्या म्हणाल्या.  पीएमएलए कायद्याअंतर्गत कराडला नोटीस आली तरी कारवाई होत नाही. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मिक कराडला वेगळा कायदा का ? असा प्रश्न सुळे य...