September 10, 2025 4:04 PM September 10, 2025 4:04 PM

views 29

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज ही माहिती दिली.   या प्रकरणातला आरोप विष्णु चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर निकम माध्यमांशी बोलत होते. या सुनावणीत न्यायालयानं दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतले असून आपला आदेश राखून ठेवल्याचं निकम यांनी सांगितलं.

April 4, 2025 2:46 PM April 4, 2025 2:46 PM

views 11

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल दिलं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.   त्यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोपींना ठिकाणावरून स्थलांतरीत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं. फरार आरोपी कृष्णा आंधळे यालाही लवकरच अटक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त क...

January 6, 2025 3:55 PM January 6, 2025 3:55 PM

views 11

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निःपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविला जावा तसेच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.