July 26, 2024 1:35 PM July 26, 2024 1:35 PM

views 8

संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळं झालेल्या गदारोळामुळं लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झालं होतं. सध्या लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

July 19, 2024 1:44 PM July 19, 2024 1:44 PM

views 25

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली.     येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सु...

July 1, 2024 1:53 PM July 1, 2024 1:53 PM

views 15

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभारप्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकुर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या लोककल्याणकारी योजनांचं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. भाजपा सरकारच्या काळात २५ कोटी लोकसंख्या गरिबीतून वर आली, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं गेलं असं ते म्हणाले.   संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर त्यांनी टीका केली. तत...