August 18, 2025 3:09 PM

views 21

अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरत घोषणाबाजी सुरू केली. या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. मात्र, त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर दोन आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्या...

July 19, 2025 8:22 PM

views 29

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .

July 11, 2025 2:47 PM

views 12

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू आहे. या बैठकीत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसंच न्यायमूर्ती जगदीश सिंग खैहर समितीसमोर सादरीकरण करतील.