December 16, 2024 3:37 PM
14
गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं निधन
संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे पुत्र, गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.