November 7, 2025 2:20 PM November 7, 2025 2:20 PM

views 12

भारतीय बँका आता अधिक प्रगल्भतेनं काम करत आहेत – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

भारतातल्या बँका एका दशकापूर्वीच्या तुलनेत आता खूप प्रगल्भतेनं काम करत आहेत,असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज दिली. भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग आणि आर्थिक विषयावरच्या परिषदेत ते मुंबईत बोलत होते. २०१८मध्ये तोट्यात असलेली बँक ते आज १०० कोटी अमेरिकी डॉलरची उलाढाल करणारी कंपनी हा भारतीय स्टेट बँकेचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला.   बँकिंग क्षेत्रासाठी आणलेल्या विविध नियमनांमुळे कर्जाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाल्याची ग्वाही मल्होत्रा यांनी ...

October 16, 2025 1:28 PM October 16, 2025 1:28 PM

views 53

अमेरिकेनं लादलेलं आयात शुल्क ही भारतासाठी चितेंची बाब नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मत

अमेरिकेनं लादलेलं ५० टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-जागतिक बँकच्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत ते बोलत होते.   स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळं अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम कमी होतो, असं त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचलं आहे. त्यांच्याशीही मल्होत्रा यांनी चर्चा केली.

December 9, 2024 7:04 PM December 9, 2024 7:04 PM

views 25

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केंद्र सरकारनं केली आहे. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील. त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. १९९०च्या राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले संजय मल्होत्रा सध्या अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर काम करत आहेत.