May 3, 2025 6:29 PM

views 32

वेव्हज् बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती- संजय जाजू

वेव्ह्ज बाजार २०२५ मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी वेव्ह्ज बाजारनं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.   या क्षेत्रातले व्यावसायिक संपर्क, सहयोग आणि नवनवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने हा समर्पित मंच ठरल्याचं जाजू यांनी म्हटलं आहे. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्ह्ज बाजारमध्ये सहभागी होत असल्याचं...

November 6, 2024 7:25 PM

views 39

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन

भारताला जगात आशयनिर्मिती आणि निर्यातीचं मोठं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वेव्ह, अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज मुंबईत दिली. विविध चित्रपट निर्मिती संस्था, स्टुडिओ, गेमिंग, ॲनिमेशन, चित्रपट इत्यादी क्षेत्रांतल्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.