October 22, 2025 8:20 PM October 22, 2025 8:20 PM
68
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
मुंबईतल्या बोरीवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करणं, अतिक्रमण रोखणं, यापूर्वी झालेल्या अतिक्रमणांना हटवून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना करणं, अतिक्रमणं हटवण्यासाठी प्रलंबित अर्जांबाबत अहवाल सादर करणं या जबाबदाऱ्या समितीवर सोपवण्यात आल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष असून राज्याचे माजी मुख्य सचिव निती...