September 22, 2024 7:04 PM

views 52

मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह पहिला भारतीय कुस्तीपटू

मिक्स्ड मार्शल आर्ट्स कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारा संग्राम सिंह हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. जॉर्जियाच्या तब्लिसी इथं सुरू असलेल्या गामा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत संग्रामनं पाकिस्तानच्या अली रझा नसीर याच्यावर अवघ्या ९० सेकंदात मात केली. संग्राम हा या स्पर्धेच्या ९३ किलो वजनी गटात सर्वात वेगवान विजय नोंदवणारा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.