March 19, 2025 7:54 PM March 19, 2025 7:54 PM

views 22

सांगली जिल्ह्यात एकूण ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्यात एकूण ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.   सध्या सांगली जिल्हा ही योजना राबवण्यात देशात द्वितीय स्थानी आणि राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे नोडल अधिकारी धनाजी पाटील यांनी ही माहिती दिली.

February 16, 2025 3:25 PM February 16, 2025 3:25 PM

views 13

सांगलीत बालस्नेही विधी सेवा योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिराचं आयोजन

बालस्नेही विधी सेवा योजना २०२४ बाबत जनजागृती करण्यासाठी सांगलीत एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामान्य किमान कार्यक्रमा अंतर्गत आयोजित या शिबिरात बालश्रम प्रतिबंध, पोक्सो यासारख्या बालहक्कांच्या कायद्यांची  तसंच ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठीच्या टोल फ्री क्रमांकाबद्दल मुलांना माहिती देण्यात आली.

January 23, 2025 3:10 PM January 23, 2025 3:10 PM

views 13

सांगलीत मिनी सरस प्रदर्शन

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटांनी तयार  केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशानं मिनी सरस प्रदर्शन सध्या सांगलीत भरलं आहे. बचत गटांच्या उत्पादनांचे ५४ स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे २१ स्टॉल अशी ७५ दालनं प्रदर्शनात आहेत.  गोंदिया इथंही सध्या मिनी सरस प्रदर्शन भरलं आहे.

January 4, 2025 3:59 PM January 4, 2025 3:59 PM

views 12

सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू

खराब हवामानामुळे द्राक्षाची बाजारपेठेतील आवक लांबल्यानंतर, आता सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक विक्री बरोबरच द्राक्ष निर्यातीलाही सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबियात नऊ कंटेनर्स मधून १७२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. सांगली जिल्ह्यात यंदा ८ हजार ४४० शेतकऱ्यांनी ४ हजार २२० एकर क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

October 17, 2024 6:57 PM October 17, 2024 6:57 PM

views 9

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १२० जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करू...

September 10, 2024 3:15 PM September 10, 2024 3:15 PM

views 10

सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली

राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. यंदाही अनेक भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप झालं.   तर, ठाणे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी विहंग गार्डन गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ...

August 29, 2024 3:42 PM August 29, 2024 3:42 PM

views 13

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘नव्या भारताचे नवीन कायदे’ विषयावर चित्र प्रदर्शनाचं आयोजन

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत कायद्यांविषयी माहिती दिली असून तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या असल्याचं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं.

July 31, 2024 3:29 PM July 31, 2024 3:29 PM

views 8

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.