February 9, 2025 1:16 PM February 9, 2025 1:16 PM

views 17

गुजरात मधे वाळू डंपर अंगावर पडल्यानं ३ महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात वाळू घेऊन जाणारा डंपर अंगावर पडल्यानं तीन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला. इथं रस्त्याचं काम सुरू असताना एका अरुंद वाटेवरून जाण्याच्या प्रयत्नात असलेला डंपर उलटला आणि काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला. यात मृत्युमुखी पडलेल्यांना क्रेन आणि बुलडोझरनं बाहेर काढून रुग्णालयात नेलं, पण तिथं त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.