December 3, 2025 7:55 PM December 3, 2025 7:55 PM

views 19

मोबाईल उत्पादकांसाठी संचार साथी मोबाईल अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही

संचार साथी या मोबाईल अॅप्लिकेशनला वाढता विरोध पाहून सरकारने मोबाईल उत्पादकांसाठी हे अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही असं स्पष्ट केलं आहे.   संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. हे अॅप वापरताना दिलेल्या परवानगी अॅपची नोंदणी करणे, नोंदणीसाठी ओटीपी पाठवणे, मोबाइलच्या IMEI ची तपासणी यासाठी वापरल्या जातील. इतर काहीही उद्देश यामागे नसल्याचा खुलासा सरकारनं केला आहे. उलट, यामुळे फसवणुक...

September 30, 2025 7:30 PM September 30, 2025 7:30 PM

views 34

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने, हरवलेले आणि चोरीला गेलेले  6 लाखांपेक्षा जास्त मोबाईल हँडसेट परत मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे नागरिकांचा डिजिटल प्रशासनावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ‘डिजिटल बाय डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित संचार साथी उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा घालण्यातमहत्वाचं  योगदान दिलं असून, ही सुविधा दर मिनिटाला एक मोबाईल फोन परत मिळवत आहे, असं दूरसंचार मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात  म्हटलं आहे.    कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या या प्रगत व्यास...

January 17, 2025 8:36 PM January 17, 2025 8:36 PM

views 22

फोनवरुन होणारी फसवणूक टाळण्यासाठी संचार साथी ॲपचं अनावरण

फोनकॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसंच मोबाईलचा गैरवापर यांना आळा घालण्यासाठी संचार साथी नावाच्या नवीन ॲपचं अनावरण आज केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं. ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त कुटुंबाना इंटरनेट सुविधा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नॅशनल ब्रॉडबँड मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवातही त्यांनी केली. डिजिटल भारत निधीच्या अंतर्गत उभारलेल्या सुमारे २८ हजार मोबाइल टॉवरच्या सुविधेचा उपयोग आता कोणत्याही मोबाइल कंपनीला करता येईल. त्यामुळे ग्राहकांसाठी नेटवर्कची उपलब्धता...