December 3, 2025 7:55 PM

views 23

मोबाईल उत्पादकांसाठी संचार साथी मोबाईल अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही

संचार साथी या मोबाईल अॅप्लिकेशनला वाढता विरोध पाहून सरकारने मोबाईल उत्पादकांसाठी हे अ‍ॅप प्री-इंस्टॉल करणं अनिवार्य नाही असं स्पष्ट केलं आहे.   संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. हे अॅप वापरताना दिलेल्या परवानगी अॅपची नोंदणी करणे, नोंदणीसाठी ओटीपी पाठवणे, मोबाइलच्या IMEI ची तपासणी यासाठी वापरल्या जातील. इतर काहीही उद्देश यामागे नसल्याचा खुलासा सरकारनं केला आहे. उलट, यामुळे फसवणुक...

December 3, 2025 3:32 PM

views 20

संचार साथी या ऍप्लिकेशनद्वारे हेरगिरी होणार नाही – मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

संचार साथी या ऍप्लिकेशनद्वारे हेरगिरी करणं शक्य नसून अशा प्रकारे कोणतीही हेरगिरी होणार नाही, अशी ग्वाही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार हे ऍप्लिकेशन सक्रिय किंवा निष्क्रीय करू शकतात तसंच त्यांच्या फोनमधून ते हटवू देखील शकतात. सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी या ऍप्लिकेशनची निर्मिती झाल्याचं शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले. या ऍपच्या माध्यमातून दीड कोटी फसव्या मोबाईल जोडण्या तोडण्यात आल्या असून चोरीला गेलेले २६ लाख मोबाईल फोन शोधण्यात आल्याचंही शिंदे म्हणा...

December 3, 2025 1:30 PM

views 38

‘संचार साथी’ ॲपबद्दल सरकारचं स्पष्टीकरण

संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. उलट, यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं, हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं, आपल्या नावावरची मोबाईल कनेक्शन तपासून अनधिकृत कनेक्शन रिपोर्ट करणं, मोबाईल हँडसेट खरा आहे किंवा नाही, हे तपासणं इत्यादी गोष्टी करणं नागरिकांना सोपं होईल, असं सरकारनं म्हटलं आहे.