August 10, 2024 4:03 PM August 10, 2024 4:03 PM
14
सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ
सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ असल्याचं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोंग- ही यांनी सांगितलं आहे. सॅमसंगच्या नोएडा इथल्या कारखान्याला जोंग - ही यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. भारतात गुंतवणूक करणारी सॅमसंग ही पहिली कंपनी असून नोएडा इथली आमची कंपनी जगातली सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून नावारुपाला आल्याचं जोंग यांनी सांगितलं.