June 5, 2025 6:44 PM June 5, 2025 6:44 PM
26
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यातले २४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित व...