July 7, 2024 3:09 PM July 7, 2024 3:09 PM

views 9

गडचिरोली जिल्ह्यात संपूर्णता अभियानाला शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड या आकांक्षित तालुक्यात काल संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली. अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तसंच महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहाराचे स्टॉल लावून त्यासंबंधी माहिती दिली.

July 6, 2024 2:53 PM July 6, 2024 2:53 PM

views 9

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, तसंच १० वी आणि १२ वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्य...

July 5, 2024 3:32 PM July 5, 2024 3:32 PM

views 4

गडचिरोलीत नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या ३ तालुक्यांमधे नीती आयोगाचे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात आलं. शिवाय शेतकऱ्यांना बियाणे कीट आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि टॅब वितरीत करण्यात आले.

July 5, 2024 3:02 PM July 5, 2024 3:02 PM

views 11

संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.   संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, तसंच १० वी आणि १२ वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्...

July 4, 2024 7:33 PM July 4, 2024 7:33 PM

views 11

नीती आयोगाचं संपूर्णता अभियानात राज्यातल्या २७ तालुक्यांचा समावेश

महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधल्या, एकूण २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.   यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्या...