April 14, 2025 3:04 PM April 14, 2025 3:04 PM
12
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
प्रचंड गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची आणखी एक धमकी देण्यात आली आहे. सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देऊ किंवा त्याला घरात घुसून मारू असं धमकीच्या संदेशात म्हटलं आहे. हा संदेश मुंबईतल्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या मोबाईलवर पाठवण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे.