January 2, 2025 1:42 PM January 2, 2025 1:42 PM

views 2

सन २०२४ मधे देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ

२०२४ या वर्षी देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ झाली असून ती २ कोटी ६० लाखापर्यंत पोहोचली आहे. कोविड काळापूर्वीचा २०१८ मधला २ कोटी ४५ लाखाचा उच्चांक या वर्षात वाहनविक्रीने ओलांडला. वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्य़ाची ऐपत वाढल्याचं हे निदर्शक आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण वाहन उद्योगाला प्रोत्साहन देणारं ठरेल असं मत उद्योगविषयक तज्ञांनी व्यक्त केलं आहे.