October 30, 2025 2:33 PM October 30, 2025 2:33 PM

views 60

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर

सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कच्च्या पोलादाचं उत्पादन ९५ लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत १६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल ५२ हजार ६०० कोटींहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा महसूल ४८ हजार ६७२ कोटी रुपये इतका होता. त्यात यंदा वाढ दिसून आली आहे.