January 28, 2025 7:17 PM January 28, 2025 7:17 PM
3
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचं तपासाबाबत स्पष्टीकरण
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वार्ताहर परिषद घेऊन तपासाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास करून आरोपीविरोधात भरपूर पुरावे गोळा केले असून या प्रकरणाच्या खटल्यावेळी ते उपयुक्त ठरतील, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीच्या बोटांच्या ठशांसंदर्भातला अहवाल अद्याप आलेला नसल्याने माध्यमांमधून प्रसारित केले जाणारे दावे चुकीचे असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपी बांगलादेशी असून त्याच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी सुरू आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.