January 19, 2025 8:16 PM January 19, 2025 8:16 PM
13
सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी
बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. त्याने आधी आपलं नाव विजय दास असं सांगितलं होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याचं खरं नाव समोर आलं. प्राथमिक पुरावे आणि त्याच्याकडे आढळलेल्या काही गोष्टींवरून तो बांग्लादेशचा नागरिक असल्याची शक्यता दिसत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे ...