November 30, 2024 1:50 PM November 30, 2024 1:50 PM

views 12

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे. महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु राजावत याची लढत सिंगापोरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. काल झालल्या सामन्यात सिंधुने चीनच्या दाई वांग हिचा तर लक्ष्य सेनने मीराबा लुआंग मैसनाम याचा पराभव केला होता. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीने चीनच्या झोऊ झी होंग आण...

November 29, 2024 7:33 PM November 29, 2024 7:33 PM

views 19

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सैद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. सिंधूने चीनच्या दाई वांगचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मिराबा लुवांग मासनमचा २१-८, २१-१९ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.