August 5, 2024 10:18 AM August 5, 2024 10:18 AM
9
98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार
98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीच्या सरहद संस्थेकडे या संमेलनाचं यजमानपद असेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं काल मुंबई मराठी साहित्य संघात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या संमेलनासाठी सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची इचलकरंजी शाखा, मुंबईची नॅशनल लायब्ररी, आणि दिल्लीच्या सरहद या संस्थांना मंडळाच्या स्थळ निवड समितीनं भेट दिली होती. संमेलनासाठी जागा, निवास व्यवस्था, संस्थेचं मनुष्यबळ, पुस्तक प्रदर्शना...