August 5, 2024 8:32 PM August 5, 2024 8:32 PM

views 22

सहारा समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17 हजार 250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समित्यांच्या नियमानुसार हे पैसे परत करण्यात आहेत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.