February 7, 2025 9:54 AM February 7, 2025 9:54 AM
13
सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमृत उद्यानात फेरीही मारली. यानंतर झालेल्या एका संवादात्मक सत्रात, सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासातील अनेक किस्से सांगितले. यावेळी विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यशस्वी होण्यासाठी सांघिक कामगिरी, इतरांची काळजी घेणे, इतरांचं यश साजरे करणे, कठोर परिश्रम करणे, मानसिक आणि शारीरिक खंबीरता विकसित कर...