September 6, 2024 9:51 AM September 6, 2024 9:51 AM

views 5

आदिवासींनी उत्त्पादीत केलेल्या वस्तुंसाठी शबरी नॅचरल्स ब्रॅंड

आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. आदिवासी विकास महामंडळाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. त्यावेळी ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.