September 13, 2024 1:30 PM September 13, 2024 1:30 PM

views 13

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला ९ सुवर्णपदकं

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिने ४९ मीटर ९१ सेंटीमीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याच स्पर्धेत अमानत कंबोज हिने ४८ मीटर ३८ सेंटीमीटर थाळीफेक करत रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नीरू पहतक हिने ५४.५० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक तर ५४.८२ सेकंदांसह सँड्रा मोल साबू हिनं रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत नयन प्रदीप सरड...