April 27, 2025 8:24 PM April 27, 2025 8:24 PM
8
लष्कराचे माजी उपप्रमुख एस पट्टाभिरामन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
लष्कराचे माजी उपप्रमुख आणि बॉम्बे सॅपर्सचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एस पट्टाभिरामन यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल तामिळनाडूतल्या निलगिरी जिल्ह्यातल्या लष्करी रुग्णालयात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. एस. पट्टाभिरामन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.