November 16, 2025 8:03 PM

views 20

मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी तसंच इतर जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक यासह धोरणात्मक विषयावर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाधमाध्यमावरल्या पोस्टमधे सांगितलं. जयशंकर यांनी थानी यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांमधले परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी भारत वचनबद्ध असल्याचं सांगितलं.

August 9, 2024 3:32 PM

views 25

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मालदीवच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. हिंद महासागर क्षेत्रात महत्वपूर्ण सामरिक भौगोलिक स्थान असलेला मालदीव हा भारताचा प्रमुख शेजारी देश आहे.  

July 28, 2024 2:45 PM

views 25

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोक्यो इथं पोहोचले. जपानमधले भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जयशंकर यांनी एदोगावा इथल्या फ्रीडम प्लाझा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. गांधीजींचा शांततेचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत असल्याचं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी बोलताना केलं. जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामीकावा यांच्या निमंत्रणावरून उद्या होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी डॉ. जयशंकर ...

June 24, 2024 2:43 PM

views 33

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रव्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान यांची अबुधाबी इथं भेट घेतली. या दोन देशांमधल्या वाढत जाणाऱ्या धोरणात्मक भागीदारीवर या भेटीत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून दिली आहे. तसंच स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.