August 31, 2024 8:28 PM August 31, 2024 8:28 PM
10
22 जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता
रशियाच्या कामचाटका भागातल्या वाझाहेट ज्वालामुखी जवळ एक एम आय ८ जातीचे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ जण होते. आज सकाळी उड्डाण केल्यानंतर काही काळात संपर्क तुटला. हेलिकॉप्टरचा शोध सुरु आहे. यासाठी मदत आणि बचाव पथक रवाना करण्यात आलं आहे.