May 17, 2025 1:55 PM May 17, 2025 1:55 PM
2
युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका प्रवासी बसमधले ९ जण ठार
युक्रेनच्या ईशान्य भागात रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका प्रवासी बसमधले ९ जण ठार झाले. या हल्ल्यात बिलोपिलिया शहरातले ४ नागरिक जखमी झाल्याचं स्थानिक लष्करी सूत्रांनी सांगितलं. २०२२ सालानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये पहिल्यांदाच थेट चर्चा झाल्यानंतर काही तासांमध्येच हा हल्ला झाला. या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही, मात्र येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही बाजू परस्परांना एक हजार युद्धकैदी परत करतील, यावर एकमत झालं.