January 17, 2025 8:32 PM

views 57

रशियाच्या लष्करात कार्यरत १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार, १६ जण बेपत्ता

रशियाच्या लष्करात कार्यरत असलेले १२ भारतीय वंशाचे नागरीक युद्धात ठार झालेत तर १६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी दिली. रशियाच्या लष्करात कार्यरत असलेल्या ९६ भारतीय वंशाच्या नागरिकांना सेवेतून मुक्त केलं असून ते मायदेशी परतले आहेत.   बांगलादेशाबरोबर भारताला सौहार्दपूर्ण संबंध हवे असल्याचं जैयस्वाल यांनी सांगितलं.  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भारताकडून परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक...

September 13, 2024 1:24 PM

views 42

रशियन सैन्यातून 35 भारतीय नागरिकांची सुटका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर 35 भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली. मोदी यांच्या भेटीपूर्वी १० भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं होतं. त्यामुळं सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या ४५ वर पोहोचली आहे. सुमारे 50 भारतीय नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहेत आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी केद्र सरकार प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.