December 29, 2025 8:25 PM

views 15

रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनला अमेरिककडून सुरक्षेची खात्री

रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकनं युक्रेनला १५ वर्षांसाठी सुरक्षेची खात्री द्यायची तयारी दाखवली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काल फ्लोरिडामध्ये भेट घेतल्यावर ते बोलत होते. ही खात्री युक्रेनला देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी आवश्यक असेल. युक्रेननं ५० वर्षाच्या सुरक्षेची खात्री मागितली आहे. ट्रम्प आणि युरोपियन देशांचे नेते सुरक्षेच्या अटींना तयार झाले तर रशियासोबत चर्चा करू असं झेलेन्स्की म्हणाले. युद्ध था...

December 7, 2025 8:25 PM

views 21

रशियाचे युक्रेनवर हवाई हल्ले

रशियानं काल रात्री युक्रेनवर संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनचे ७७ ड्रोन पाडल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनमधल्या क्रेमेन्चुक शहरातल्या पायाभूत सुविधांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. क्रेमेन्चुक हे युक्रेनमधलं सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण असून ते एक औद्योगिक केंद्र आहे.     युक्रेन आणि त्याच्या पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांच्या अनुसार युक्रेनच्या वीजजाळ्याला ठप्...

November 8, 2025 8:09 PM

views 24

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात १० ठार, २८ जखमी

रशियानं मध्यरात्री युक्रेनवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या तीन प्रातांमध्ये महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना फटका बसला आहे. रशियानं साडेचारशेपेक्षा जास्त ड्रोन्स आणि ४५ क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. तर, युक्रेननं डागलेले दोन हवाई बॉम्ब आणि १७८ हवाई यंत्रं पाडल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.

October 22, 2025 8:18 PM

views 62

युक्रेनमधे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

युक्रेनमधे रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांमधे किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमधे अन्य २१ जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कीवच्या अनेक भागात नागरी वस्तीत आग पसरली. याच्या प्रत्युत्तरात युक्रेनने रशियतल्या रसायन प्रकल्पावर ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियाने अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही.   दरम्यान, रशियाचे अध्यक्...

October 5, 2025 7:39 PM

views 30

रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो घरांमध्ये काळोख पसरला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला असून आपण युक्रेनच्या लष्करावर आणि पायाभूत सुविधांवर  यशस्वीरीत्या हल्ला केल्याचं म्हटलं आहे.   रशियाच्या भूप्रदेशात हल्ले करण्यासाठी  युक्रेनला मदत करेल या अमेरिकेच्या भूमिकेनंतर हा हल्ला झाला आहे. तर रशियाच्या हवाई संरक्षण दलानं युक्रेनच्या ३२ ड्रोनना उध्वस्त केल्याचं रशियाच्या प्र...

June 6, 2025 8:27 PM

views 57

यूक्रेनचे १७४ ड्रोन रशियानं केले नष्ट

रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने यूक्रेनचे १७४ ड्रोन अडवून ते नष्ट केले आहेत. मॉस्को, क्रिमिया यासह अनेक ठिकाणांच्या दिशेने हे ड्रोन येत असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. तसंच, काळ्या समुद्रावरून येणारी यूक्रेनची क्षेपणास्त्रंही रशियाने नष्ट केली आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत.  

May 11, 2025 8:48 PM

views 10

युक्रेनशी १५ मेपर्यंत विनाविलंब वाटाघाटी सुरू करायचं रशियाचं आवाहन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी १५ मे पर्यंत विनाविलंब वाटाघाटी सुरू करायचं आवाहन केलं आहे. प्रस्तावित चर्चा तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये व्हावी, असं राष्ट्रपती पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरच्या भाषणात सांगितलं. यामध्ये दोन्ही देश नवीन युद्धबंदी करारावर सहमत होऊ शकतात, अशी शक्याताही पुतीन यांनी व्यक्त केली आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी यावर चर्चा करणार असल्याचं पुतीन यांनी सांगितलं आहे. युक्रेननं मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही....

March 19, 2025 10:42 AM

views 36

युक्रेनमधील उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात युध्दविराम करण्याबाबत सहमती

युक्रेनमधील उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील 30 दिवस युध्दविराम करण्याबाबत सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यादरम्यान 90 मिनिटं दुरस्थ माध्यमातून काल चर्चा झाली. त्यांनतर ही माहिती देण्यात आली. दरम्यान उर्जा क्षेत्रातील युध्दबंदीसंदर्भात युक्रेननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.   मात्र, रशियन राष्ट्राध्यक्ष संपूर्ण युक्रेनमधील युद्धबंदीला विरोध करत आहेत. अशी माहिती क्रेमलिननं दिली आहे. तीन वर्षांच्या संघर्षादरम...

March 14, 2025 1:25 PM

views 53

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची जागतिक नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी सातत्यानं लक्ष घातल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.  जागतिक स्तरावर अनेक आव्हानं असूनदेखील युद्धग्रस्त भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल त...