November 22, 2025 1:19 PM November 22, 2025 1:19 PM

views 22

…तर सैन्य आगेकूच करत राहील, रशियाचा युक्रेनला इशारा

रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव युक्रेननं फेटाळला, तर रशियाचं सैन्य आगेकूच करत राहील, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रस्तावाबद्दल अद्याप अमेरिकेशी तपशीलवार चर्चा झालेली नाही, मात्र आपल्याला त्याची प्रत मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युक्रेनचा या प्रस्तावाला विरोध असला, तरीही, रशियाचं सैन्य युक्रेनमध्ये आगेकूच करत आहे, याची कल्पना युक्रेन कि...

November 15, 2025 7:41 PM November 15, 2025 7:41 PM

views 8

युक्रेनचा रशियाच्या नोव्होरोसियस्क बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला

  युक्रेननं काल रात्री रशियाच्या नोव्होरोसियस्क या बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला केला. त्यामुळे लागलेल्या आगीत पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. रशियाच्या सर्वात मोठ्या तेल निर्यात सुविधांपैकी एक असलेल्या या टर्मिनलवर युक्रेनियन सैन्यानं हल्ला केल्याच्या वृत्ताला  दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, रशियानं काल रात्री युक्रेनचे २१६ ड्रोन नष्ट केल्याचं रशियन गव्हर्नर वेनियामिन कोंड्राटिव्ह यांनी सांगितलं. 

September 15, 2025 9:05 PM September 15, 2025 9:05 PM

views 18

युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशाला रशियाचा इशारा

रशियाच्या मालकीच्या मालमत्तेवर आणि ठेवींवर टाच आणून युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक  युरोपियन देशाला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा आज रशियानं दिला आहे. युरोपियन आयोग रशियाची मालमत्ता ताब्यात घेऊन युक्रेनला निधी पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असून या पार्श्वभूमीवर रशियानं कारवाईचा इशारा दिला असल्याचं  सूत्रांनी म्हटलं आहे.   रशियाची ३०० बिलियन डॉलर इतक्या किमतीची मालमत्ता आणि ठेवी अमेरिकेच्या, इंग्लंडच्या तसाच युरोपिअन राष्ट्रांच्या ताब्यात आहेत. २०२२ मध्ये रशियानं युक्रेनवर ह...

August 18, 2025 1:39 PM August 18, 2025 1:39 PM

views 4

युक्रेन-रशिया युद्धाच्या निराकरणासाठी व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आज युरोपमधल्या काही नेत्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियाच्या ताब्यात असलेल्या काही भागांवरचा दावा सोडावा, यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढवला आहे.   झेलेन्स्की यांची इच्छा असेल, तर ते रशियाविरुद्धचं युद्ध कोणत्याही क्षणी थांबवू शकतात, किंवा सुरू ठेवू शकतात, याचा पुनरुच्चार काल ट्रम्प यांनी केला. सध्या युक्रेनच्या जवळपास २० टक्के भूभागावर रशियाचा ताबा आहे.

March 31, 2025 8:07 PM March 31, 2025 8:07 PM

views 2

रशिया-युक्रेन युद्धबंदीवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं

युक्रेनमधे शांतता प्रस्थापित करण्याच्या शक्य त्या पर्यायांवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी  यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण रागावलो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर रशियानं हे निवेदन दिलं आहे. मात्र दरम्यान रशियानं युक्रेनशी युद्ध सुरुच ठेवलं असून खारकिववर सलग दुसऱ्या रात्री हल्ले केले.    दुसरीकडे स्वीडनच्या सरकारनं युक्रेनला ...

March 29, 2025 7:20 PM March 29, 2025 7:20 PM

views 9

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर २१ जण जखमी

युक्रेनमध्ये डनिप्रो शहरावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झाले आहेत. काल रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक रेस्टॉरंट आणि अनेक निवासी इमारतींना आग लागल्याचं या प्रदेशाचे प्रमुख सेर्ही लिसाक यांनी सांगितले. पश्चिम बेल्गोरोड भागात युक्रेनच्या तीन ड्रोनना पाडण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.  

March 11, 2025 6:04 PM March 11, 2025 6:04 PM

views 2

सौदी अरेबियात रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चा

युक्रेन आणि रशियात सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी सौदी अरेबियात जेद्दाह इथं युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय चर्चेला आज सुरूवात झाली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, युक्रेनचे अधिकारी आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत.    काळ्या समुद्राच्या प्रदेशात युद्धविराम व्हावा असा आपला प्रस्ताव असेल, यामुळे जहाजांची ये जा सुरळीत होऊ शकेल अशी माहिती या युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी दिली होती. त्याचवेळी युक्रेनमधील दुर्मीळ खनिज संप...

March 8, 2025 8:52 PM March 8, 2025 8:52 PM

views 7

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार

युक्रेनमधील डोनेस्क आणि खारकीवसह अनेक भागांत रात्रभर सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांमध्ये १४ जण ठार ठाले. युक्रेनच्या  अधिकाऱ्यांनी सांगितलं की रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं, अनेक रॉकेट आणि ड्रोनच्या सहाय्यानं डोब्रोपिलिआवर हल्ला केला. यात आठ मजली इमारती आणि ३० वाहनांचं नुकसान झालं.    दुसरीकडे, युक्रेनला माहिती देणं थांबवण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेची अंतराळ कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीज् ने युक्रेनला उपग्रह छायाचित्रं पाठवणं बंद केलं आहे. 

February 25, 2025 1:48 PM February 25, 2025 1:48 PM

views 6

रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत-चीन तटस्थ

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युक्रेनने मांडलेल्या रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत आणि चीन हे दोन्ही देश अलिप्त राहिले आहेत. तर ठरावाच्या विरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मतदान केलं आहे. ठरावाच्या बाजूनं ९३, विरोधात १८ आणि ६५ देश गैरहजर राहिल्यानं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  दरम्यान सध्या अमेरिका रशियासोबत युक्रेनसंबधी शांती-प्रस्तावावर चर्चा करत आहे.