January 24, 2026 5:57 PM
रशियाने युक्रेनवर केेलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
रशियाने युक्रेनवर काल रात्री केेलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. दोन्ही देशातला संघर्ष थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर अबुधाबी इथं चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाला. युक्रेन आणि रशिया यांच्यातला हा संघर्ष थांबावा यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली ही पहिलीच बैठक आहे.