December 3, 2025 8:25 PM December 3, 2025 8:25 PM

views 14

डॉलरच्या तुलनेत विनियम दरात रुपया ९० रुपयांच्या निचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात आज पहिल्यांदाच ९० रुपयांची पातळी ओलांडली. दिवसअखेर एक डॉलरचा विनिमय दर २५ पैशांनी घसरुन ९० रुपये २१ पैशांवर या विक्रमी निचांकी पातळीवर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं सुरु ठेवल्यानं तसंच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. अमेरिकेसोबत न झालेला व्यापार करार, रिझर्व्ह बँकेनं रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्यानं सुद्धा ही घसरण सुरू आहे.     रुपयाच्या या घसरणीमुळं सरकार फार चिंतेत नाह...