July 4, 2025 4:15 PM July 4, 2025 4:15 PM

views 6

नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू-रूपाली चाकणकर

नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज नंदुरबार इथं आढावा बैठकीत केलं. या पथकांनी बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी तसंच  कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाबाबत  कडक कारवाई करावी. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरूद्ध कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांच्या कार्याचा अहवाल प्रशासनानं  १५  दिवसांत आयोगाला सादर करावा, असे निर्देशही चाकणकर यांनी याव...

February 18, 2025 8:06 PM February 18, 2025 8:06 PM

views 6

India’s Got Latent: यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या मजकूराच्या चौकशीचे निर्देश

"India's Got Latent" या यू ट्यूब चॅनेलवर तरुण पिढीच्या दृष्टीनं वाईट मजकूर प्रसिद्ध झालेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. दोन वकिलांकडून आयोगाला ही तक्रार मिळाली आहे, असं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं.

February 13, 2025 3:59 PM February 13, 2025 3:59 PM

views 18

विधवा महिलांना पूर्णांगिनी म्हणावं – रुपाली चाकणकर

पतीचं निधन झालेल्या महिलांना विधवा न म्हणता पूर्णांगिनी म्हणावं, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज केलं. त्या छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेला संबोधित करत होत्या. या कार्यशाळेचं उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झालं. संबोधनातला हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगानं शासनाकडे शिफारस केल्याचंही त्यांनी सांगितलं.

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 12

मेळघाटमध्ये महिलेची धिंड काढल्याप्रकरणी ५ जणांना अटक

मेळघाटमध्ये एका महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रकरणी समिती स्थापन करून सविस्तर अहवाल आठवडाभरात आयोगाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं चाकणकर म्हणाल्या. 

December 19, 2024 6:59 PM December 19, 2024 6:59 PM

views 7

आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्गात जनसुनावणी

कोकणाला एक वैचारिक बैठक असून इथे महिलांचा सन्मान राखला जातो असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं. आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत चाकणकर यांनी आज सिंधुदुर्गात ओरोस इथं जनसुनावणी घेतली, त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जनसुनावणीत आलेल्या एकशे वीस तक्रारींपैकी एकही तक्रार लैंगिक अत्याचाराची नव्हती असं त्यांनी सांगितलं.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतल्या सरकारी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या आहेत. मात्र खाजगी आस्थापनांपैकी ज्यामध्ये अश...